Facebookचे नवे सुरक्षा फिचर, मॅसेंजरमधून स्क्रिनशॉट घेतला तर मिळणार नोटिफिकेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुक मेसेंजर अॅपमधील युजर्सचा संवाद आणखी सुरक्षित व्हावा यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. यापुढे मेसेंजरमधून कुणी तुमच्या मेसेजचा स्क्रिनशॉट घेतला तर नोटिफिकेशन मिळणार आहे.

स्क्रिन डिटेक्शन फिचर असे नव्या फिचरचे नाव आहे. याच्या मदतीने मेसेंजरचा कुणी स्क्रिनशॉट घेतला हे लगेच समजेल. फेसबुक पुढील काही आठवडय़ात एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅट मेसेजसाठी ही सुविधा देणार आहे.

फेसबुक मेसेंजरवर नुकतेच काही फिचर्स देण्यात आले आहेत. यात एंड टू एंड एन्क्रिप्शन, स्क्रिनशॉट डिटेक्शन, मेसेज रिअॅक्शन, टायपिंग इंडिकेटर यांचा समावेश आहे. एंड टू एंड एन्क्रिप्टेड चॅट आणि स्क्रिनशॉट डिटेक्शन हे दोन खास फिचर्स आहेत. युजर्स या फिचर्सची गेल्या काही दिवसांपासून वाट पाहात होते. लवकरच फिचर्स उपलब्ध होतील, असेही समजतंय. गेल्या वर्षी फेसबुकने व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉलसह ग्रुप चॅटसाठी एंड टू एंड एन्क्रिप्शनची चाचणी सुरू केली. आता एंड टू एंड एन्क्रिप्शन फिचर्स सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.