फॅशन-पॅशन…रेट्रो फॅशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तौफिक कुरेशी

फॅशन म्हणजे? – साधे राहणीमान.

व्यक्तिगत आयुष्यात कशाप्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता? मला साधे, सुटसुटीत कपडे घालायला आवडतात. शॉर्ट कुर्ते, शर्ट असे कपडे आवडतात.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? – तुमचे व्यक्तिमत्त्व. तुमचे चालणे, बोलणे.

आवडती हेअर स्टाईल? माझीच.

 फॅशन जुनी की नवी? – जुनी फॉलो करायला आवडले. त्यामागे भावनिक ओढ आहे. माझ्या बाबांची जशी मी पोशाखाची शैली पाहिली आहे, माझ्या गुरू उस्ताद अल्लारखां यांना, झाकीर हुसेन यांना जसे पाहिले आहे त्यामुळे तसेच राहणीमान मला आवडते. साठ-सत्तरच्या दशकातील फॅशन फॉलो करायला मला आवडते. त्यामुळे माझ्या फॅशनमध्ये जुन्या काळातील प्रभाव जास्त असतो.

आवडता रंग? – निळा.

तुमच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते – मी छानसा कुर्ता घातला की माझ्या बायकोला आवडतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का? – खूप क्वचित. जास्त कधी केली नाही.

कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च करता? – मी संगीताशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, त्यावर जास्त खर्च करतो.

ज्वेलरीमध्ये काय आवडते? – मी जास्त ज्वेलरी वापरत नाही. पण कानात कायम लहान डायमण्ड स्टड घालतो.

आवडता ब्रॅण्ड? – ब्रॅण्ड वगैरे असे काही नाही. मला जसे आवडतात तसेच कपडे घालतो.

फॅशन फॉलो कशी करता? – हल्लीची फॅशन मला आवडत नाही. मी मासिकं वगैरे वाचत नाही. माझा वॉर्डरोब पण माझ्याचसारखा साधा आहे. त्यात सात-आठ कुर्ते, सात-आठ शर्टस् आणि पॅण्ट आहेत. त्यामुळे जे आवडे ते घालतो.

 ब्युटी सिक्रेट – आपले अंतर्मन चांगले असायला हवे. मुळात मी शांत स्वभावाचा आहे. त्यामुळे आतून शांत असल्याने त्याचे तेज चेहऱयावर दिसते. शिवाय ताण घेत नाही.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी? – शेव्हर, परफ्युम, मेडीसिन पाऊच.

फिटनेससाठी… संगीताचा रियाज.