पावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…

3111

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकप्रिय फॅशन करणे प्रत्येकालाच आवडते. मात्र, पावसाळ्यात फॅशनेबल राहणे कठीण असते. आपण आपल्या कपड्यांचे छत्री किंवा रेनकोट वापरुन संरक्षण करु शकतो. पण पायांचे काय ? पावसाळ्यात पायांचा संर्पक सतत जमिनीवर साचलेल्या चिखल, धूळ आणि मातीशी येत असतो. शिवाय पावसाळ्यात उंच हिलच्या चपला वापरणे शक्य नसते. तसेच साचलेल्या पाण्यातून चालताना पाणी आणि चिखल उडून त्याचे डाग कपड्यांवर आणि चपलांवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे काहीजण फॉरमल शुज किंवा सॅंडल बॅगेत ठेवतात आणि ऑफिसमध्ये वापरतात. घरातुन बाहेर पडताना साध्या पावसाळी चपला घालून बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्या चपला वापरायच्या असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी बाजारात आता रबर व प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या फॅन्सी पावसाळी चपला बाजारात आल्या आहेत.

टी-स्ट्रॅ़प सॅंडल

या सॅंडल पावसाळ्यात फॉरमल ते कॅज्युल अशा कोणत्याही पेहरावावर वापरु शकतो. लिंकींग रोड , फॅशन स्ट्रिट , कॉजवे मार्केट या ठिकाणी या सॅंडल उपलब्ध आहेत . या सॅंडलमध्ये निऑन, फ्लोरोसंट कलरच्या सॅंडल तरुणाईच्या जास्त पसंतीस पडत आहेत. तसेच या सॅंडल पिवळा , लाल , गुलाबी व निळा या रंगांमध्ये सुद्धा बाजारात मिळतात . या सॅंडलची किंमत कमीतकमी 100 रु इतकी आहे.

t-strap-sandle t-strap-03

गमबुट

गमबुट हे आधी शेतात किंवा अवजडवर मोठ्या प्रमाणावर वापरले जात . पण सध्या या गमबुटचा वापर पावसाळ्यातील ट्रेंडी फुटवेअर म्हणून केला जात आहे . या गमबुटांमध्ये निऑन ग्रीन , पिंक किंवा ट्रान्सपरन्ट असे रंग उपलब्ध आहेत. लिंकींग रोड , फॅशन स्ट्रिट येथे हे शुज मिळतात. 200 ते 350 रु. एवढ्या किंमत आहे

gumboots-01

बलेरीअन्स शुज

या शुजची खासियत म्हणजे हे दिसताना जरी लेदर शुज दिसत असले तरी ते वॉटर प्रुफ असतात त्यामुळे फॉरमल ते कॅज्युल अशा कोणत्याही पेहरावावर हे शुज उठुन दिसतात. या शुजमध्ये प्रिंट , कलर व मटेरियल यांमध्ये विविधता आढळते. 200 रु. पर्यंत हे शुज बाजारात सर्वत्र उपलब्ध आहेत.

02-balerians

आपली प्रतिक्रिया द्या