कोस्टारिकाचे आव्हान संपुष्टात; ब्राझीलची विजयी किक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सेण्ट पीटर्सबर्ग

पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ब्राझीलने शुक्रवारी कोस्टारिकाला २-० अशा फरकाने हरवून फिफा वर्ल्ड कपमधील ‘ई’ गटात आपला पहिला विजय नोंदवला. स्वित्झर्लंडविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागणाऱ्या ब्राझीलने दुसऱया लढतीत झोकात पुनरागमन केले. ९० मिनिटापर्यंत गोलशून्य बरोबरीत असलेल्या या लढतीत इंजुरी टाइममध्ये फिलीप कॉटीन्होने ९१व्या मिनिटाला आणि नेमारने ९७व्या मिनिटाला गोल करीत ब्राझीलच्या विजयाची बोहनी केली. कोस्टारिकाला सलग दोन लढतींत हार सहन करावी लागल्यामुळे त्यांचे मानाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

१९७४-७८ची पुनरावृत्ती टळली
ब्राझीलने कोस्टारिकाला हरवून वर्ल्ड कपमधील सलग चार लढतींमध्ये विजय न मिळवण्याची नामुष्की टाळली. याआधी १९७४ आणि १९ सालामधील वर्ल्ड कपमध्ये ब्राझीलच्या संघाला सलग चार लढतींमध्ये विजय मिळवण्यात अपयश आले होते. २०१४ सालामध्ये मायदेशात झालेल्या अंतिम फेरीच्या आणि तिसऱया स्थानासाठीच्या लढतीत ब्राझीलचा संघ पराभूत झाला होता. त्यानंतर यंदा सलामीच्या लढतीत त्यांना स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले होते. त्यामुळे कोस्टारिकाविरुद्धच्या लढतीत त्यांच्या कामगिरीवर साऱयांच्या नजरा खिळल्या होत्या.