अकरावी प्रवेशासाठी आज अखेरची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2026-27 अंतर्गत नियमित तीन आणि विशेष तीन फेऱ्यांनंतरसुद्धा प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने नव्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या फेरीत कॅप अंतर्गत 96,537, विविध कोटय़ांतर्गत 10,905 असे एकूण 1 लाख 7 हजार 492 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.

मुंबई विभागात आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स शाखांसाठी एकूण 31 हजार 839 विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये कॉमर्स शाखेत 18 हजार 171, सायन्स 9 हजार 828 तर आर्टस्मध्ये 3 हजार 840 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 24 जुलैला सकाळी 10 वाजता रिक्त जागा जाहीर केल्या जातील. नवीन नोंदणी व अर्ज भाग 1 व 2 दुपारी 1 ते 25 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत केले जातील. अलॉटमेंट यादी व कटऑफ यादी 28 जुलैला सकाळी 10 वाजता केले जाईल. 28 जुलैला सकाळी 11 वाजता ते 29 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.