मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामांना आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानखुर्दमधील भंगाराच्या गोदामांना पहाटे तीनच्या सुमरास आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे 150 जवान ही आग विझवण्याचे काम करत आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.