समोर आला व्हिक्टोरिया चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! असे म्हणत पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या व्हिक्टोरिया या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये होणार आहे . या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच पुष्कर जोग नकारात्मक भूमिका साकारतांना दिसणार आहे .

निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग स्कॉटलंडमध्ये त्यांच्या तिसऱ्या मराठी चित्रपट “व्हिक्टोरिया” साठी पुन्हा एकत्र आले आहेत. ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

नुकतेच त्यांनी व्हिक्टोरिया या मराठी चित्रपटाची घोषणा केली.पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका या चित्रपटात आहे .हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे.जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांची निर्मिती संस्था गुसबम्पस एंटरटेनमेंटचा एकत्रित तिसरा मराठी चित्रपट आहे.अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णीसह हा तिसरा चित्रपट आहे. या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत.आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत , वैशल शाह हे सह निर्माता आहेत .नुकतेच या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे .