
सामना ऑनलाईन, संगमेश्वर
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधल्या धामणी गावात एक विचित्र अपघात झाला आहे. इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने ही गाडी नदीत कोसळली. गाडी नदीत पडल्यानंतर त्यात असलेले ४ जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांमधअये एका लहान मुलाचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर घडलेल्या या दुर्घटनेत गाडीच्या चालकाला मात्र वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे.

























































