
टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकातून काही खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी टीम इंडियाच्या दोन कर्णधारांमधील मतभेद त्यांच्या या पुस्तकातून मांडले आहेत. श्रीधर यांच्या पुस्तकातील दाव्यानुसार टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली व सध्याचा कर्णधार रोहीत शर्मा यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद झाले होते. त्यामुळे संघात देखील दोन गट पडले होते. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा वाद वाढला नाही.
2019 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरोधातील सामना हरल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये मोठ्य प्रमाणात तणावाचं वातावरण होतं. आम्हाला समजलं होतं की टीम इंडियात दोन गट तयार झाले आहेत. एक रोहीतचा व एक विराटचा. त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावरूनही अनफॉलो करायला सुरुवात केलेली. त्यानंतर दहा दिवसांनीच आम्ही वेस्ट इंडिज विरोधात खेळण्यासाठी गेलो. तिथे पोहोचल्यानंतर रवी शास्त्रीने सर्वप्रथम विराट व रोहीतला त्याच्या खोलीवर बोलावून घेतलं व त्यांना संघातील वातावरण चांगले असणे किती गरजेचे आहे ते समजावलं” असे या पुस्तकात लिहलेले आहे.
” ते संघातील सिनियर खेळाडू असून त्यामुळे त्यांच्यातील हे मतभेद इथेच संपले पाहिजे असं सांगितले. मला तुम्ही दोघांनीही तुमच्यातले मतभेद मागे ठेवून एकत्र संघासाठी खेळावे असे वाटते. रवी शास्त्रींनी नेहमी प्रमाणे त्यांच्या वेगळ्या शैलीत त्यांना समजावले होते’, असे या पुस्तकात म्हटले आहे.



























































