
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असून आज धुळे जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी आमदार अशोक धात्रक यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.
या पक्षप्रवेश सोहळय़ात माजी आमदार धात्रक यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहर, धुळे ग्रामीण, साखरी, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह धुळे महानगरपालिका माजी नगरसेवक व शेकडो मुस्लिम बांधवांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे धुळय़ात शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली आहे. या पक्षप्रवेश सोहळय़ाप्रसंगी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सुभाष देसाई, माजी आमदार शरद पाटील आाणि अमजत पठाण, आसिफ समदशहा, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संघटक शुभांगी पाटील, साखरी तालुका उपसभापती माधुरी देसले, प्रियंका जोशी यांच्यासह धुळे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, धुळे शहरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, धुळे महापालिकेचे प्रथम महापौर भगवान बापूजी करनकाळ, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, कैलास पाटील, हिम्मत साबळे, भरत राजपूत, भरत मोरे, ललीत माळी आदी उपस्थित होते.

























































