टेनिस मॅच सुरू असताना जबरदस्तीने चुंबन घेतले, मॉडेलचा ट्रंप यांच्यावर खळबळजनक आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर एका मॉडेलने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एमी डॉरीस असं या मॉडेलचे नाव आहे. ‘द गार्डीयन’ या वृत्तपत्राला एमीने दिलेल्या मुलाखतीमध्ये हा आरोप केला आहे. या मुलाखतीत तिने सांगितलंय की 1997 साली अमेरिकन ओपन टेनिस टुर्नामेंट (US Open) सुरू असताना ट्रंप यांनी जबरदस्तीने माझे चुंबन घेतले. एमीच्या या आरोपांचा ट्रंप यांच्याकडून इन्कार करण्यात आला असून त्यांच्या वकिलांनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

Photo Courtesy- The Guradian
Photo Courtesy- The Guradian

एमीने नेमकं काय घडलं होतं हे सविस्तरपणे या मुलाखतीत सांगितलं आहे. तिने सांगितलं की हा प्रकार घडला तेव्हा ती अवघ्या 24 वर्षांची होती आणि ट्रंप हे 51 वर्षांचे होते. ट्रंप हे त्यांची दुसरी बायको मार्ला मेपल्ससोबत राहात होते. टेनिस स्पर्धा सुरू असताना ट्रंप आणि एमी व्हीआयपी सूटमध्ये बसले होते. ट्रंप यांनी मला जबरदस्ती पकडून ठेवलं होतं आणि मी त्यांच्या पकडीतून स्वत:ला सोडवूच शकत नव्हते असं एमीने म्हटलंय. एमी हिने तिच्या आरोपांना बळकटी मिळावी यासाठी काही फोटोही सादर केले आहेत, जे द गार्डीयनने प्रसिद्ध केले आहेत. या फोटांमध्ये ट्रंप आणि ती एकत्र पाहायला मिळत आहेत. या फोटोंबाबत ट्रंप यांच्या वकिलांनी म्हटलंय की एमीची विधाने ही बिनबुडाची आणि भरोसा करण्याच्या लायकीची नसल्याचं म्हटलंय. जर एमीसोबत अप्रिय घटना घडली असेल तर त्याचे साक्षीदार असायला हवेत असं ट्रंप यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. हे सगळे आरोप एमी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट उद्देशाने करत असल्याचेही ट्रंप यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

Photo Courtesy- The Guradian
Photo Courtesy- The Guradian

एमी डोरीसने ट्रंप यांच्या वकिलांना सडेतोड उत्तरं देताना म्हटलंय की गार्डीयनला तिने एक वर्षांपूर्वीच मुलाखत दिली होती. त्यांनी त्यावेळी ती प्रकाशित करणं रोखून धरलं होतं. एमीच्या जुळ्या मुली असून आपण त्यांच्यासाठी आदर्श व्यक्तिमतव असावे या उद्देशाने हे सगळं करत असल्याचं तिचं म्हणणं आहे. ट्रंप यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही त्यांच्यावर असाच प्रकारचे बरेच आरोप झाले आहेत.

अमेरिकेतील स्तंभलेखिका ई जीन कॅरल हिने आरोप केला होता की ट्रंप यांनी 1990 साली एका डिपार्टमेंटल दुकानात तिच्यासोबत कपडे बदलण्याच्या खोलीत लैंगिक चाळे. केले होते. 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी ट्रंप यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. याच निवडणुकीपूर्वी ट्रंप यांच्यावर महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने करतानाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपनंतर त्यांनी त्यांच्यावर आरोपांबद्दल माफी मागितली होती.

पॉर्नस्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनिअल्स हिने तर एक पुस्तकच लिहिले होते, ज्यात तिने तिने ट्रंप यांच्या सोबतच्या संबंधांचा उल्लेख केला होता. ट्रंप यांनी स्टॉर्मीसोबत आपले कोणतेही संबंध नसल्याचा सातत्याने दावा केला होता. मात्र स्टॉर्मीने आपली बाजू ठामपणे मांडत ट्रंप यांच्यासोबत 2006 मध्ये आपले अफेअर होते आणि कॅलिफोर्निया व नेवाडादरम्यान असलेल्या लेक टोहोय हॉटेलमध्ये ट्रंप यांच्याशी भेट झाली होती, असा दावा स्टॉर्मी डेनियल्स हिने केला होता. ट्रंप यांनी आपल्याला डिनरचे आमंत्रण दिले आणि यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा आम्ही सेक्स देखील केला असता दावा स्टॉर्मी डेनियल्सने केला होता. स्टॉर्मी हिने ट्रंप यांना न्यायालयात खेचले होते. ट्रंप यांच्याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर गप्प राहण्यासाठी मोठी रक्कम (97 लाख रुपये) देण्यात आली आणि यासाठी एक करार देखील करण्यात आला होता, असे स्टॉर्मी डेनियल्स हिने म्हटले होते. हा खटला नंतर रद्द झाला, मात्र या खटल्यासाठी स्टॉर्मी डेनियल्स हिने वकीलावर केलेला खर्च ट्रंप यांनी द्यावा असे आदेश कॅलिफोर्नियातील एका न्यायालयाने दिले होते. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स हिला 33 लाख रुपये ( 44 हजार 100 डॉलर) द्यावे लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या