Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘4 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, August 04, 2023)
धार्मिक कार्यात स्वत:ला गुंतवा. मन:शांतीकरिता योगसाधना, ध्यानधारणेचा आधार घ्याल. सांपत्तिक स्थितीत सुधारणा होईल. आश्चर्याचा सुखद धक्का देणारी घटना घडेल. मिळालेल्या संधीचे सोने कराल. समाजात मान मिळेल. योग्य व्यक्तिकडून मार्गदर्शन घ्याल. घरात नवीन शोभेची वस्तू आणा.
शुभरंग : जांभळा

वृषभ (TAURUS – Friday, August 04, 2023)
पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळावर लावा. आरोग्य राखणे आणि चांगले दिसणे यासाठी प्रयत्न करावे लागतील. मोकळा वेळ मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घ्या. नवीन गोष्टी शिकण्याकडे कल वाढेल. सकाळी तुळशीला पाणी घाला. नवीन चांदीच्या पैजणांची खरेदी कराल.
शुभरंग : पोपटी

मिथुन (GEMINI – Friday, August 04, 2023)
गणपती अथर्वशीर्ष वाचा. वेळेचा सदुपयोग कराल. प्रिय व्यक्तिवर निष्ठा ठेवा. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात रमाल. घरातील लहान मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ खाऊ घाला. फुलदाणीत लाल गुलाबाचे फूल ठेवा. कलेतील कौशल्य वाढीस लागेल.
शुभरंग : राखाडी

कर्क (CANCER – Friday, August 04, 2023)
आज केलेली गुंतवणूक समृद्धी आणि सुरक्षितता देईल. कामाचा वेग टिकून राहण्यासाठी मनाला रिझवणाऱ्या गोष्टी घडतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अनावश्यक बोलण्यात बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. सकारात्मक राहा. पत्नीशी लडीवाळ भांडण होण्याची शक्यता आहे. तातडीचा प्रवास लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा असेल. स्वत:ला घरकामात गुंतवाल.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Friday, August 04, 2023)
पाकिटात रेशमाचे पांढरे कापड ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस संपर्क साधण्यासाठी दिवस चांगला आहे. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी करू नका. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा. अनपेक्षितपणे एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : मोरपिसी

कन्या (VIRGO – Friday, August 04, 2023)
इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. आजची सायंकाळ आनंदात जाईल. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. नातेवाईकांचे घरी अनपेक्षित येणे होईल. लोकांनी सांगितलेल्या चुकांकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.
शुभरंग : पांढरा

तूळ (TULA- Friday, August 04, 2023)
काळ्या रंगाच्या गाईची सेवा करा. स्वत:बद्दल छान वाटावे, अशा गोष्टी घडण्याचा आजचा दिवस आहे. गुंतवणुकीचे इतर पर्याय धुंडाळा. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होईल. अनुभवी लोकांशी व्यवसायाची बोलणी कराल. सामाजिक कामाचे आकर्षण वाटू लागेल.
शुभरंग : केशरी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, August 04, 2023)
आराम कराल. निराशावादी दृष्टीकोन बाळगू नका. घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल. जबाबदारीत वाढ होईल. जोडीदाराला खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. प्रेम प्रकरण वेगळेच वळण लागेल. आरोग्याची काळजी घ्याल. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या.
शुभरंग : नारिंगी

धनु (SAGITTARIUS – Friday, August 04, 2023)
वडाच्या झाडाला दूध अर्पण करा. राग अनावर होऊ शकतो. मनाला शांती लाभेल. सामाजिक कार्यात लाभेल. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल. घरातील वातावरण प्रसन्नदायी असेल. प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. आहारात फळांचा समावेश करा. हरवलेली वस्तू सापडेल.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Friday, August 04, 2023)
धार्मिक स्थळी बदामाचा प्रसाद अर्पण कराल. दागदागिन्यांची खरेदी कराल. एखादी चांगली बातमी मिळेल. प्रवासामुळे नवीन ठिकाण पाहायला मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तीशी गाठभेट होईल. जोडीदार तुमच्याकडे प्रेम व्यक्त करेल. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करा.
शुभरंग : केशरी

कुंभ (AQUARIUS – Friday, August 04, 2023)
गणपती मंदिरात प्रसाद वाटा. विश्रांती घेण्यासाठी वेळ काढा. जोडीदाराचा उगाच राग ओढवून घेऊ नका. योजना सफल होण्यासाठी मेहनत घ्याल. घराच्या परसात पांढऱ्या सुगंधी फुलांचे फूलझाड लावा. घरातील मोठ्या व्यक्तिंचे आशीर्वाद घ्या. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : काळा

मीन (PISCES – Friday, August 04, 2023)
व्यसन करू नका. मारुतीरायाच्या मंदिरात बदामाचा प्रसाद वाटा. लॉकरमध्ये मोगऱ्याची ताजी फुले ठेवा. कार्यालयातील कामाकरिता वरिष्ठ कौतुक करतील. योग्य लोकांसमोर तुम्ही तुमचे कौशल्य दाखवाल. आपली सार्वजनिक प्रतिमा चांगली बनेल. आवडती कामे करण्यात वेळ घालवाल. कोणाकडूनही उधार घेऊ नका.
शुभरंग : पिवळा