फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम – मरे,बुचर्ड, पिरोनकोवाला वाइल्ड कार्ड एण्ट्री

186

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा आटोपल्यानंतर आता टेनिसपटूंसह जगभरातील टेनिसप्रेमींना फ्रेंच ओपन या लाल मातीवरील ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उत्सुकता लागून राहिली आहे. रफाएल नदाल या स्टार खेळाडूचे या स्पर्धेने पुनरागमन होत असून नोवाक जोकोविचही मागील स्पर्धेचे अपयश पुसून टाकण्यासाठी सज्ज झाला असेल. यावेळी फ्रेंच ओपन स्पर्धा आयोजकांकडून ऍण्डी मरे, उगीन बुचर्ड व स्वेताना पिरोनकोवा या तीन खेळाडूंना फ्रेंच ओपन स्पर्धेत वाईल्ड कार्ड देण्यात आले आहे.

ऍण्डी मरे हा माजी नंबर वन खेळाडू असून 2016 सालामध्ये त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेतही तो दुसऱया फेरीपर्यंत पोहोचला होता. कॅनडाची उगीन बुचर्ड हिने 2014 साली फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. शिवाय गेल्या महिन्यात लाल कोर्टवरील मोसम सुरू झाल्यापासून ती नॉनस्टॉप खेळत आहे. तीन वर्षांनंतर पहिलीच स्पर्धा खेळणाऱया बल्गेरियाच्या स्वेताना पिरोनकोवा हिने अमेरिकेन ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व गाठत सर्वांनाच चकीत केले होते. त्यामुळे तिलाही फ्रेंच ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या