पावसासाठी आणखी आठवडा वाट पहा

सामना ऑनलाईन, मुंबई

पावसासाठी आणखी आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. कारण,२२ ते २८ जून याच काळात मुंबईसह उपनगरात मान्सून खऱया अर्थाने सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते गोवा यादरम्यान तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर महाराष्ट्र ते गोवा असे सरकले आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई ते गोव्यादरम्यान येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज स्कायमेटचे संचालक महेश पलावत यांनी व्यक्त केला. तर कुलाबा व सांताक्रुझ वेधशाळेनेही मुंबईसह उपनगरात चांगला पाऊस पडेल असे म्हटले आहे.