अकरावी प्रवेशाची पुन्हा संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावीत प्रवेशच न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशाची आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ’प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ (FCFS Extended) या फेरीद्वारे 26 मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेश हवा असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या वाढीव वेळेत आपला प्रवेश निश्चित करावा. FCFS Extended ही अकरावी प्रवेशाची शेवटची संधी असून 26 मार्चनंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया बंद होणार आहे. ही वाढीव वेळ फक्त अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन देण्यात आलेली आहे. या फेरीत मिळालेला प्रवेश रद्द केल्यास पुन्हा या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे शिक्षण संचालक दत्ताञय जगताप यांनी स्पष्ट केले. अकरावी प्रवेशाची वेबसाईट – https://11thadmission.org.in