
गणेशोत्सवासाठी मुंबई व इतर भागातून सिंधुदुर्गात येण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी गणेशभक्तांसाठी एसटीकडून जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या या कालावधीत एसटीच्या 359 फेऱ्यांच्या माध्यमातून 16 हजार 68 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. य़ा वाहतुकीतून एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला 69 लाख 25 हजार 565 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या वर्षी 246 फेऱ्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग विभागाला 40 लाख 82 हजार 21 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत सिंधुदुर्ग विभागाला यंदा 28 लाख 43 हजार 544 रुपये जास्त उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे अनेक भाविकांनी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळगावी येणे टाळले होते. यावर्षी कोरोनाचे सावट गडद नसल्याने भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी आले होते.
यावर्षी प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या सावंतवाडी आगारातून मुंबई तसेच जिल्ह्याबाहेर 35 फेऱ्या जादा सोडण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून 6 लाख 71 हजार 292 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
- मालवण आगाराला 49फेऱ्यातून 10 लाख 31 हजा र51 रुपये ,
- कणकवली आगाराला 82 फेऱ्यातून 15 लाख 29 हजार 851रुपये,
- देवगड आगाराला 56 फेऱ्यांमधून 11 लाख 73 हजार 42 रुपये,
- विजयदुर्ग आगाराला 65 फेऱ्यातून 12 लाख 44 हजार 742रुपये,
- वेंगुर्ला आगाराला 43 फेऱ्यातून 7 लाख 44 हजार 945 रुपये,
- कुडाळ आगराला 29 फेऱ्यातून 5 लाख 30 हजार642 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील तळेरे बसस्थानक येथे ब्रेक डाऊन व्हॅन कार्यरत ठेवण्यात आली होती. त्याशिवाय बांदा ते खारेपाटण या परिसरात फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात होते. तर रेल्वेच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील कणकवली,कुडाळ,सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवरून लिकिंगच्या गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
























































