
गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. मात्र, सध्या पुण्यासह महाराष्ट्रात डिजे बंदीचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. विद्यानंद बापट यांनी हा मुद्दा लावून धरल्याने गणेशोत्सव मंडळविरुद्ध बापट अशी लढाई सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असतान बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे हा मुद्दा आता आणखी गंभीर झाला आहे. माराहण करणाऱ्या संतोष चव्हाणला पोलिसांनी अटक केली असून या घटनेबाबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, “अशा प्रकारे मारहाण करणं योग्य नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मत मांडत असताना हल्ला करणं योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मला असे वाद योग्य वाटत नाही. मी पहिले देखील सांगितलं आहे की, गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे. त्या दृष्टीने काय करता येईल त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. कदाचित पहिल्या वर्षी शंभर टक्के प्रतिसाद मिळणार नाही. पण शंभर टक्के पारंपरिक गणेशोत्व करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.”




























































