
पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचे नाव प्रारुप मतदार यादीत ‘स्थलांतरित’ (Shifted) म्हणून नोंदवण्यात आल्याने नवा राजकीय वागंद निर्माण झाला आहे. आपला मतदार आयडी मोहालीमध्ये नोंदणीकृत असतानाही हे नाव स्थलांतरित दाखवण्यात आले असून, आम आदमी पक्ष सरकार राजकीय सूडबुद्धीने निवडणूक यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप चड्ढा यांनी केला आहे. तर आम आदमी पक्षाने या आरोपांचे खंडन करत राघव चड्ढा यांच्यावरच जबरदस्त पलटवार केला आहे.
पंजाबमध्ये पार पडलेल्या SIR मोहिमेनंतर तयार करण्यात आलेल्या मसुदा मतदार यादीत राघव चड्ढा यांचे नाव ‘स्थलांतरित’ श्रेणीत टाकण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना चड्ढा यांनी सोशल मीडियावर लिहिले की, पंजाबमधील ‘आप’ सरकारने आता सूडाचे राजकारण मतदार यादीतही आणले आहे. ते पंजाबमधून विद्यमान राज्यसभा खासदार आहेत आणि त्यांचा मतदार आयडी मोहालीत नोंदणीकृत आहे. तरीही त्यांचे नाव स्थलांतरित दाखवणे ही केवळ लिपिकीय चूक वाटत नसून राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे.
राघव चड्ढा यांनी एप्रिलमध्ये आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. राघव चड्ढा यांनी एक्सवर लिहीले की, ही केवळ प्रारुप मतदार यादी असून अंतिम यादी नाही. दावे आणि हरकतींच्या प्रक्रियेदरम्यान नावात सुधारणा केली जाते. अंतिम मतदार यादी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होणार असून, नियमांनुसार उपलब्ध असणाऱ्या उपायांचा वापर आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्याला ‘स्थलांतरित’ म्हणून चिन्हांकित कोणी केले आणि याची पडताळणी कोणी केली, असा सवाल करत यात पंजाब सरकारचे अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.
Raghav Chadha has been caught by a National Daily English Newspaper, trying to get his voter registration made in Delhi through a backdated process, and is now attempting to put the entire blame on the Aam Aadmi Party (AAP) and Punjab government.
SIR is conducted by the Election… https://t.co/RDXkoGkGeI
— AAP (@AamAadmiParty) September 3, 2026
दरम्यान, ‘आप’च्या पंजाब प्रवक्त्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक्सवर लिहीले,मतदार यादी SIR ची मोहीम निवडणूक आयोग राबवतो, राज्य सरकार नाही. मतदार यादीत कोणाचे नाव समाविष्ट करायचे किंवा हटवायचे यात पंजाब सरकारची कोणतीही भूमिका नसते. राघव चड्ढा हे दिल्लीत राहत असून पंजाबमध्ये राहत नाहीत, ही जाहीर बाब आहे. जर ते पंजाबमध्ये राहत नसतील, तर आपल्या मतदार नोंदणीची माहिती अद्ययावत ठेवणे ही त्यांची स्वतःची जबाबदारी होती. मतदार यादीतील या नोंदीसाठी ते ‘आप’ किंवा पंजाब सरकारला दोष देऊ शकत नाहीत असा जबरदस्त पलटवार केला आहे.




























































