कुख्यात गँगस्टरचा भाजपमध्ये प्रवेश; दरोडा, खून, अपहरण सारख्या 21 गुन्ह्यांची नोंद, एन्काऊंटरसाठी पोलीस घेत होते शोध

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गँगस्टर्सना पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमधून धुवून काढण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहेत. बरेलीचा कुख्यात गँगस्टर सोनू कनोजिया याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोनू कनोजिया याच्यावर दरोडा, खून, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे यासारखे 21 गुन्हे दाखल आहेत.

उत्तर प्रदेशमधील आओन्ला लोकसभा मतदारसंघाचे खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला कॅबिनेट मंत्री धर्मपाल सिंह, खासदार धर्मेंद्र कश्यप, माजी मंत्री सुरेश राणा यांच्या उपस्थितीमध्ये कुख्यात गँगस्टर सोनू कनोजिया याने भाजपमध्ये प्रवेश केला. गँगस्टरच्या पक्षप्रवेशाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपवर जोरदार टीका होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सोनू कनोजिया याच्यावर दरोडा, खून, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे यासारखे 21 गुन्हे दाखल आहेत. बरेली पोलीस स्थानकामध्ये सोनू कनोजिया याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) गुन्ह्यांची नोंद आहे. एन्काऊंटर करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तत्पूर्वीच कनोजिया याने भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)