समलिंगी विवाहाला मान्यता द्या, समलिंगी कपलची सुप्रीम कोर्टात धाव; केंद्राकडे 4 आठवडय़ांत मागितले उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी एका समलिंगी जोडप्याने विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून चार आठवडय़ांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

पहिली जनहित याचिका दहा वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या हैदराबादमधील सुप्रियो चक्रवर्ती व अभय डांग यांनी दाखल केली आहे. त्यांनी आता मॅरेज कम कमिटमेंट सेरेमनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या लग्नाला स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत अधिकृत मान्यता मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरी जनहित याचिका गेल्या 17 वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या पार्थ फिरोज मेहरोत्रा व उदय राज आनंद यांनी दाखल केली आहे.