
सामना ऑनलाईन । सोच्ची
टोनी क्रूसने अखेरच्या क्षणाला केलेल्या गोल्डन गोलच्या जोरावर गतविजेत्या जर्मनीने स्वीडनवर २-१ ने मात करत फिफा विश्वचषक स्पर्धेत आपले आक्हान कायम राखले आहे. ग्रुप एफच्या अत्यंत रोमांचकारी सामन्यात जर्मनीकडून मार्के रिऊस (४८ मि.) आणि टोनी क्रूसने (९०.५ मि.), तर स्वीडनकडून एकमेव गोल ओला टॉक्होननने (३२ मि.) केला.
सामन्याच्या ८२ क्या मिनिटाला १-१ अशी बरोबरी असताना जर्मनी १० खेळाडूंच्या सहाय्याने खेळत होती. तरीही गोल करण्याच्या अनेक संधी त्यांनी निर्माण केल्या. अखेर अतिरिक्त खेळात स्वीडनच्या गोलक्षेत्राबाहेर जर्मनीला मिळालेल्या प्री किकवर क्रूसने बनाना किक मारत जर्मनीचा या विश्वचषक स्पर्धेतील पहिला किजय नोंदवला.
जर्मनीच्या आक्रमणांचा धडाका
त्यानंतर जर्मनीने आक्रमणाची धार अधिक तेज केली. प्रथम मिडफिल्डर इल्कै गॅन्डोगनने आणि त्यानंतर थॉमस मुलर यांच्या प्रयत्नांना स्वीडनचा गोलकीपर ओल्सनने निप्रभ केले. मध्यंतराच्या अतिरिक्त खेळात स्वीडनच्या लार्सनच्या प्री किकवर बर्गने हेडरद्वारा गोल करण्याचा प्रयत्न न्यूअरने हाणून पाडला आणि स्वीडनला आघाडी घेण्यापासून रोखले.
टॉक्होनने स्वीडनचे खाते उघडले
तिसऱ्याच मिनिटाला टिमो कॉर्नरकडून मिळालेल्या हेडपासवर जुलियन ड्रेक्सेलरने पेनल्टी स्पॉटकरून किक मारली, मात्र स्कीडनचा डिफेडर गॅरेनक्किस्टने अफलातून बचाक करत जर्मनीला रोखले. पहिल्या अर्ध्या तासात चेंडूकर जर्मनीचा ताबा असला तरी ३२ क्या मिनिटाला क्लेसनकडून मिळालेल्या पासकर टॉक्होननने जर्मन गोलकीपर मॅन्युअल न्यूएरच्या डोक्याकरून चेंडू गोलपोस्टमध्ये टाकत स्कीडनचे खाते उघडले.
रिसकडून जर्मनीचे पुनरागमन
मध्यांतरानंतर जर्मनीवर पिछाडी भरून काढण्याचा दबाव वाढला आणि ४८ व्या मिनिटाला ड्रैक्सेलरच्या ठिकाणी बदली होऊन आलेल्या मारिया गोमेझने स्वीडनच्या गोलक्षेत्रात मार्के रिऊसकडे चेंडू पास केला. मार्के रिऊसने चेंडूला हलका धक्का देत गोल वरून जर्मनीला बरोबरी साधून दिली. त्यानंतर आघाडी घेण्यास उत्सुक जर्मनीने लागोपाठ आक्रमण केले, पण कधी नशीब तर कधी स्कीडनच्या गोलकीपरच्या चपळाईमुळे अपयशी ठरत होते.

























































