गाझियाबादच्या हॉटेलमध्ये सापडला 23 वर्षीय तरूणीचा मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाझियाबाद येथील डासना भागात असलेल्या अनंत नावाच्या हॉटेलमध्ये शनिवारी एका तरूणीचा मृतदेह आढळला. ही तरूणी दोन दिवसांपूर्वी स्वत:च्या निकाहच्या खरेदीसाठी हापूरहून आली होती. या खरेदीसाठी तिच्यासोबत तिचा मित्र ही आला होता. दोघांनी रात्रीच्या वास्तव्याकरीता हॉटेल रूम बूक करून राहिले होते.

शहजादी असे या 23 वर्षीय मृत तरूणीचे नाव असून ती धौलाना, हापूर परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहत होती. येत्या नोव्हेंबरमध्ये दिल्ली शहरात स्थित असलेल्या एका तरूणाशी शहजादीचा निकाह होणार होता. मात्र गेल्या शुक्रवारी ही तरूणी अझरूद्दिन नावाच्या आपल्या मित्रासमवेत लग्नाच्या खरेदीचे कारण सांगत घराबाहेर पडली. डासना शहरातील अनंत नावाच्या हॉटेलमध्ये रूम बूक केली होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोघे हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी आले.

शहजादी आणि अझरूद्दिनला 209 क्रमांकाची खोली देण्यात आली होती. याच खोलीमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना तरूणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. शहजादीचा मृत्यू झाल्याचे अझरूद्दिननेचं तिच्या भावाला कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदना करीता पाठविण्यात आला.

शहजादीचा मित्र अझरूद्दिन शनिवारी रात्रीच खोलीची चावी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे सोपवून स्वत: फरार झाला. शहजादीचा भाऊ दानिश याने पोलिसांत तक्रार केली असून, त्याने अझरूद्दिनवरचं संशय घेतला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मृत्तिकेच्या तोंडून फेस असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तरूणीने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे, याचा पोलिस तपास करत आहेत.