खुशखबर ! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन | मुंबई

सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात ६०० ते ८०० रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचाही दार प्रति किलोमागे ६२० रुपयांनी खाली आला आहे.

आंतरराष्टीय बाजारात झालेली सोने-चांदीदरातील घसरण आणि सराफा बाजारातून कमी झालेली मागणी यामुळे सोन्या -चांदीचे दर कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी सोन्याचा दर प्रति तोळा (१० ग्राम) ३० हजार ५०० रुपयांवर आला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ३९ हजार २०० रुपये झाला होता. गेल्या फेब्रुवारीत सोन्याच्या दराने प्रतितोळा ३१ हजार रुपयांची पातळी गाठली होती.