
सराफी पेढीत खरेदीचा बहाण्याने शिरलेल्या महिलांनी 20 हजारांची सोन साखळी लांबविल्याची घटना कर्वेनगरमधील नगरकर गोल्ड अॅण्ड पल्स पॅ्रा. लि. सराफी पेढीत घडली आहे. याप्रकरणी कर्मचारी ओंकार तिखे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिला नगरकर गोल्ड अॅण्ड पल्स प्रा. लि सराफी पेढीत शिरल्या होत्या. सोनसाखळी आणि जोडवी खरेदीचा बहाणा त्यांनी केला. त्यावेळी गर्दी असल्याची संधी साधून दोन महिलांनी ट्रे मधील 20 हजारांची सोन साखळी लांबविली. त्यानंतर काहीही खरेदी न करता पेढीतून बाहेर पडल्या. काही वेळानंतर कामगार तिखे यांनी ट्रे ची पाहणी केली. तेव्हा सोनसाखळी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन महिलांनी चोरी केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हनुमंत मासाळ तपास करत आहेत.


























































