सोने आवाक्याबाहेर जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सोन्याबरोबर चांदीच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशातच इराण-इस्त्राइल यांच्यातील संघर्षाचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे. तणावाच्या परिस्थितीत सोन्या-चांदीच्या किमती अजून वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

एप्रिल महिन्यात सोन्याचे दर दिल्लीत 24 क@रेटसाठी 74 हजार रुपयांपर्यंत पोहचले. त्यानंतर दहा दिवसांत सोन्याच्या दरात 3765 रुपयांची वाढ होऊन प्रति तोळा 74,370 रुपये पोचला. चांदीचे भाव देखील वाढले आहेत. चांदी 85 हजार 500 प्रति किलो झाली आहे. सोने आणि चांदी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. इराण-इस्त्राइल यांच्यात युद्ध सुरू झाल्याने सोन्याच्या मागणी वाढल्याने किमतीदेखील वाढत आहेत.