
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढउतार दिसून येत आहे. सोन्याचा भाव प्रतितोळा 62 हजार रुपये इतपत आहे. मात्र, भाववाढ तसेच सततच्या उतार-चढावामुळे सोन्याची मागणी 17 टक्क्यांनी घटली आहे. मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत 112 टन एवढी मागणी होती. याचा सोने आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 24 टक्क्यांनी आयात घटून 35 अब्ज डॉलरवर आली आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानने एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत 600 टन सोन्याची आयात केली. सोन्याच्या तुलनेत चांदीची मागणी वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आयात 6.12 टक्क्यांनी वाढून 5.29 अब्ज डॉलर एवढी चांदी आयात झाली.

























































