
अदिती सारंगधर,[email protected]
सगळ्या सेलिब्रिटीजच्या जिवलगांविषयी लिहिताना माझ्यात खूप बदल होत गेला. मी समृद्ध झाले. तुम्हीही तुमच्या घरातील, भवतालच्या जिवलगांवर
प्रेम करा. भेटूया लवकरच!!
नवीन वर्ष, नवीन आशा, नवी स्वप्नं, नवी उमेद, नव्या इच्छा, नव्या आकांक्षा घेऊन सुरूवात तर सुंदरच झाली. गेल्या अख्ख्या वर्षात डोकावून बघताना लक्षात आलं… बापरे… या ‘जिवलग’च्या निमित्ताने कित्ती अनोळखी ओळखीचे झाले. कितीतरी ओळखीचे अनोळखी वागले. कित्ती ओळखी वाढल्या. किती ओळखी खऱया कळल्या. माणसं नाही समजली, पण कृत्ती समजल्या. मोठं होण्याच्या आणि मोठं करण्याच्या… आपल्या पिल्लांचं संगोपन करणारी माणसं भेटली. आपल्या कुत्र्या मांजरांना सांभाळणारी माणसं भेटली… आणि आपल्या पेटच्या जीवाची फारशी पर्वा नसणारीही भेटली. माणूस म्हणून समृद्ध केलं या गेल्या वर्षाने मला…
आर्वर्जून पुन्हा एकदा काही आठवणी शेअर कराव्याशा वाटतात. आदेश आणि सुचित्रा बांदेकरांचं माझं पहिलं ‘जिवलग’चं आर्टिकल… सुरूवात केली तेव्हा वाटलं, मस्त आहे. करू की… पण प्रत्येक जिवलग नेमक्या दहा बारा प्रश्नांच्या उत्तरात बसवायचा नव्हता मला… त्याला भेटून, त्याला बघून, त्याला जाणून त्यांच्याबद्दल लिहायचं होतं. मग फोटोग्राफर, मी आणि गप्पा असं त्रिकूट घेऊन जायचे सगळीकडे… मुळात पत्रकार, लेखिकेचा माझा पिंड नसल्याने हा प्रकास वाटला तेवढा सोप्पा नाही झाला… पण एक मात्र नक्की… आई म्हणून, व्यक्ती म्हणून खूप पेशन्स शिकवले मला…
तर सिम्बा मला भेटलेला पहिला ‘जिवलग’… 24 मार्च 2018. सकाळी सकाळी सुचित्राताईचा फोन आला. ’अगं, खूप मस्त झालंय आर्टिकल… कित्ती मज्जा आली वाचून… आमच्या सिम्बाचा लेख…’ एक्झॅटली हेच मनात होत?. ’आमच्या सिम्बाचा लेख’… सेलिब्रेटी आईवडील असले तरी जीवलगचा सेलिब्रेटी पेटच असणं आवश्यक होतं. आदेशदादा, सुचित्राताई आणि सोहम खूप बिझी असले तरी त्यांच्या पिल्लावर अतोनात प्रेम आणि मुळात त्याला आवश्यक वेळ देणारे…
त्यानंतर देवदत्त नागे. आपला मल्हारी… अलिबागला त्याच्या नोराला सांभाळतोय. खुल्या वातावरणात मस्तमौला आयुष्य जगणारी नोरा…
मग अदिती आणि विशाल कामत… दोघेही अवलिया… प्राण्यांवर प्रचंड प्रेम करणारी मंडळी… घरी जाऊन फोटोशूट करताना इतकी मज्जा आली होती… नुकतीच बबली आई झालीये… सुंदर, क्युट, काळ्याभोर पिल्लांचा फोटो बघून वाटलं आणाव त्यातलं एक.
मग विष्णूजींशी बोलले. हा सुग्रास शेफ आणि खवय्या माणूस. आपल्या पिल्लांचेही तितकेच खवय्येगिरी करत लाड पुरवतो. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज केल्यात त्यांनी… मस्तच.
मग आमची कुरळ्या केसांची… गोड खळीवाली नेहा जोशी. तिच्या मनीमाऊबरोबरच बोलले. मुंबईतला तिचा प्रवास माऊने सुकर केलाच, पण त्या एकटेपणाला जवळही येऊ नाही दिलं…
आरती आणि मॅक्सिमसशी बोलले मग… एडिटींग करणारी आरती फिटनेसकडे वळली होती. पण स्टुडिओतसुद्धा मॅक्सला घेऊनच फिरते. व्यायामाला येणाऱया सगळ्याच मॅक्सच्या टेन्शनने फुल्ल जोशात एक्सरसाईज करायला लागल्या.
खरं सांगू… नाव नाही लिहिणार पण यानंतरची दोन आर्टिकल करताना जरा वाईटच वाटलं. त्रास झाला. वाटलं, झेपत नसेल तर का बरं ही माणसं प्राणी पाळताहेत? काळजी घेता येत नसेल, वेळ देता येत नसेल, नीट मनापासून प्रेम करता येत नसेल तर का बरं यांनी घरात आणून ठेवलंय या जिवलगांना… आधी काही दिवस बाळांना सांभाळताना मी कुठे कमी पडतेय का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण यावेळी मात्र बरं झालं, आपण असं करत नाही असं बरं वाटलं.
मग माझी जुनी मैत्रीण आणि नव्यानेच आई झालेली क्षिती जोग… क्यंकूची आई आणि हेमंत ‘क्यंकू ढोमे’चा बाबा… मी भेटलेल्या जिवलगांपैकी एक अत्यंत वेल मेंटेन्ड पेट… शक्य तेव्हा आणि शक्य तिथं लाड पुरवत, ओरडा खात कित्ती गोड मोठं करतायत त्याला… पूर्वी रात्रभर मज्जा करायला भेटणारी आमची मैत्रीण 10च्या आत घरात…
त्यानंतरच खूप इंटरेस्टींग जिवलग केलं ते नीना कुलकर्णी आणि सोहा कुलकर्णीचं… मला माहीतच नसणा-या ‘गावाशी’ माझी ओळख करून दिली या आर्टिकलने… ‘ऑनिमल कमियुनिकेशन’ नावाचं काहीतरी असतं… खरंच… असं झालं. पहिल्यांदा सोहा माझ्या मुलाशी झोरोशी बोलली. पहिल्यांदा त्याच्या मनात नक्की काय चाललंय मला कळलं… माझ्या मुलाबरोबरच्या माझ्या नात्यात आमुलाग्र बदल झाला. ठराविक गोष्ट करताना त्याचा पर्सपेक्टीक्ह लक्षात यायला लागला. तो असं का वागतोय किंवा असं झालं तर तो कसं वागू शकतो हे कळलं. माझ्या मुलावर खरं तर त्याचं विशेष प्रेम नव्हत … त्या ‘का’चं कारण कळलं आणि आमच्या वागण्यात आम्ही थोडा बदल केला. जादू झाल्यासारख्या गोष्टी बदलल्या. का…
आता कोण? या प्रश्नाचं उत्तर सिद्धार्थ आणि मितालीच्या डोरानं दिलं. कित्ती सुंदर मैत्रीपूर्ण नातं आहे त्यांचं. मग स्मिता तांबे आणि तिच्या माऊडय़ा… मग आमची जुई गडकरी…
त्यानंतर असं वाटलं कलाकारांच्या पेट्सना तर ग्लॅमर असतंच, पण खऱया अर्थाने ज्यांचं जीव सांभाळण्याचं, जोपासण्याचं काम करणारे… त्यांच्या आजारपणात एका फोनकर धावून येणारे… ऑन डय़ुटी 24 तास जागे असणारे डॉक्टर्स… दीपा कटियालशी बोलले. प्रेम, सेवा किती निरपेक्ष आणि खरी असू शकते ते दिसलं… डोळ्यांत पाणी आलं तिच्या मेडिकली अनफीट असणाऱया तिच्या सगळ्या बाळांची काळजी घेताना पाहून…
सुप्रियाताई (सुप्रिया पिळगावकर) आपल्याला अभिनेत्री म्हणून माहीत असल्या तरी ऑनिमल ऑक्टिक्हीस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख झाली. प्रेम तर काढलंच, पण आदरही दुणावला. तसंच निवेदिता सराफच्या बाबतीतसुद्धा… काही माणसं मानानं, कर्तृत्वानं, वयानं मोठी असतातच, पण व्यक्ती म्हणून त्याहीपेक्षा मोठी असतात याचा प्रत्यय आला.
या प्रकासाचे 6 ते 7 महिने निघून गेले आणि मह खऱया अर्थाने खूप वेगळ्या धर्तीची माणसं भेटली. अनुपमा ऑनिमल ऑक्टिक्हीस्ट, कम्युनिकेटर आणि खऱया अर्थाने प्राण्यांच्या जीकनासाठी, सुबक आयुष्यासाठी झटणारी अनुपमा मुखर्जी…
अभिनेत्री म्हणून आपल्याला माहीत असली तर, प्राण्यांसाठी किती आणि काय करू शकते का करतेय याची जाणीव करून देणारी सक्षम आई… मधुगंधा कुलकर्णी… सर्पमित्र श्याम जोशी…
तर आज अचानक वार्षिक अहवाल वाचल्यासारखा मी आढावा बिढावा का घेतेय असं वाटतंय…? हो. कारण वेळ आलीये एका अल्पविरामाची… थोडं थांबण्याची… तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याची… माझ्या बुद्धीला थोडं खाद्य देण्याची… त्याचं चर्वण करण्याची… अजून खूप खूप वाचण्याची आणि वाचलेलं खूप सारं तुमच्याशी शेअर करण्याची…
एका छोटय़ाश्या ब्रेकनंतर… माझ्यावर केलेल्या प्रेमाचे आभार नाही मानणार… कारण वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या ऋणात राहायला आवडतं मला… खूप खूप प्रेम फक्त…





















































