गुगलचे कर्मचारी ऐकतात तुमचं खासगी ऑडिओ रेकॉर्डिंग?

218

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आजच्या जगात गुगल माहीत नाही असा कोणीही नेटकरी शोधूनही सापडणार नाही. आपल्या हरएक गोष्टीसाठी गुगलवर अवलंबून असणाऱ्या अनेकांसाठी गुगल ही एक सवय झाली आहे. पण, जर तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही तुमच्या फोनवर जे बोलता तेही गुगल ऐकतं तर? काय गहजब उडेल ना.. पण हो असं खरंच होतं, असं गुगलने मान्य केलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गुगल होम स्मार्ट स्पीकर या गुगल सेवेचे कर्मचारी तुम्ही तुमच्या फोनमध्ये असलेलं तुमचं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकतात. हे गुगलनेही मान्य केलं आहे. पण, याच्यामागील कारण काहीसं वेगळं आहे. गुगलचं स्मार्ट स्पीकर हे फिचर विविध भाषांमधून ट्रान्स्क्राईब ही सेवा पुरवतं. या सेवेत विविध स्थानिक भाषांमधून बोलणं ऐकून त्यांचे अर्थ लावण्याचं काम केलं जातं आणि त्यानुसार या फीचरमध्ये सुधारणा व्हावी या हेतूने हे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकली जातात, असं गुगलचं म्हणणं आहे. तसंच, गुगलचे तज्ज्ञ जे रेकॉर्डिंग ऐकतात ते खासगी नसतं, असा दावाही गुगलने केला आहे.

अर्थात अशा प्रकारे एखाद्या व्यक्तिच्या फोनमधली खासगी रेकॉर्डिंग ऐकणं हा हे फीचर वापरणाऱ्याच्या गोपनीयतेचा भंग आहे. या मुद्द्यावरही गुगलवर सध्या काही तज्ज्ञ टीका करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या