पैसा फंड हायस्कूलमध्ये 623 विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी प्रशालेतील एकूण 623 विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला लस देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मोरे, डॉ. लिंगायत व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक नेहा संसारे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

लसीकरण मोहिमे दरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास झाला नाही. खबरदारी म्हणून यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जवळपास 90 टक्के पालक यावेळी उपस्थित होते. प्रशालेतील एकूण 623 विद्यार्थ्यांना आज गोवर रुबेला लस देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी देखील न घाबरता ही लस टोचून घेतली. रत्नागिरीचे लसीकरण नियंत्रक तुषार साळवी, लॅब नियंत्रक शिर्के,बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यु एम दळवी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या सुषमा वासावे , वैदेही काणेकर, झाडगांवर, सहाय्यक पावसकर आदि कर्मचारी उपस्थित होते.