
सामना ऑनलाईन । बलीया
राममंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेशातील भाजप आमदारानेच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राममंदिर निर्माणाच्या कार्याला विलंब होत असल्याने भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यावरच हल्ला चढवला आहे. देशाला नरेंद्र मोदीसारखा महान पंतप्रधान लाभला आहे. ते हिंदुत्त्ववादी आहेत. योगी अदित्यनाथ यांच्यासारखा प्रखर हिंदुत्ववादी नेता मुख्यमंत्री आहे. तरीही आमचे श्रीराम तंबूत आहेत. हे देशाचे आणि हिंदू समाजाचे दुर्भाग्य आहे, असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सरकारने राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Modi ji jaisa mahan PM ho wo bhi hinduvadi aur Yogi ji jaisa mahan hinduvadi neta CM ho, uss samay bhi Bhagwan Ram tent mein rahen, isse bada durbhagya Bharat aur Hindu samaj ke liye nahi hone wala. Aisi paristhiti banai jaani chahiye ki Ram mandir Ayodhya mein bane: S Singh,BJP pic.twitter.com/Nmq2UN5ijo
— ANI UP (@ANINewsUP) November 17, 2018
देशात संविधानाचे स्थान सर्वात महत्त्वाचे आहे. मात्र, देव संविधानापेक्षा मोठा असल्याचे सांगत हा देशातील जनतेचा आस्थेचा विषय असल्याने सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आम्ही जनतेचे नेते असल्याने संविधानाचे महत्त्व जाणतो. मात्र, देव संविधानापेक्षा मोठा आहे. देशातील जनता आस्था आणि धर्माशी कोणतीही तडजोड मान्य करणार नाही. राम मंदिर निर्माणाबाबत आधिक विलंब करू नये. राम मंदिर निर्माणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणीही सिंह यांनी केली आहे. याआधाही वादग्रस्त विधाने केल्याने सुरेद्रं सिंह चर्चेत आले आहे. राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना लक्ष्य केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.




























































