नोकरी देण्याच्या बहाण्याने इंजिनिअर महिलेवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरी देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना हरयाणाच्या गुरुग्राम येथे घडली आहे. एका मॉलच्या पार्किंगमध्ये ही भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

आरोपीचं नाव तुषार कपूर असं आहे. पीडिता इंजिनियर आहे. 11 फेब्रुवारी रोजी पीडित महिलेला नोकरीच्या मुलाखतीसाठी गुरुग्राम येथील मॉलमध्ये बोलवण्यात आलं होतं. जेव्हा पीडिता मॉलमध्ये पोहोचली, तेव्हा तुषार कपूर तिला भेटला. थोडं जुजबी बोलणं झाल्यानंतर त्याने तिला घरी सोडण्याविषयी सांगितलं.

आपली गाडी पार्किंगमध्ये असल्याचं सांगून तिला पार्किंगमध्ये बोलवलं. तिथे त्याने तिला पाणी देखील प्यायला दिलं. पाण्यात मादक पदार्थ मिसळल्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याने गाडीतच तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या तक्रारीनुसार, तुषारने स्वतःची ओळख रोजगार मिळवून देणाऱ्या रिक्रुटर अशी करून दिली होती. त्याने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर त्याने तिला धमकी दिली आणि तिथून फरार झाला. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे.