
कुटुंबीयासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून कामगारांनी हडपसरमील अॅमनोरा पार्वâ टाउनमधील बंगल्यातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून 15 लाखांची चोरी केली आहे. ही घटना 16 ते 17 मार्चदरम्यान घडली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणजित विश्वनाथ महातो (वय 35, रा. बंगाल) आणि सुरेंद्र दरसुराम राम (वय 37 रा. झारखंड ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने फिर्यादी दिली आहे. फिर्यादी अॅमनोरा पार्कमधील बंगल्यात राहायला आहेत. तीन दिवसांपुर्वी ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी बंगाल्यात कामाला असलेल्या दोघांनी सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून 15 लाखांचे दागिने चोरून नेले. गावाहून परत आल्यानंतर बंगल्यात चोरी झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

























































