नैनीतालमध्ये ठिकठिकाणी हल्द्वानी हिंसाचार आरोपींचे पोस्टर्स; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

8 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथे बेकायदेशीर मदरसा आणि मशीद पाडल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. वनभूलपुरा परिसरात अतिक्रमण काढण्याकरीता आलेल्या पोलीस, प्रशासन आणि महापालिकेच्या पथकावर हल्लेखोरांकडून हल्ला केला होता. दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबारही करण्यात आला. अनेक वाहनांसह पोलीस ठाण्याला घेराव घालून जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी वनभूलपुरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. आता नैनिताल पोलिसांनी दंगलीत वाँटेड असलेल्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे.

पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले आहेत. तसेच इतर पुराव्यांच्या आधारे आतापर्यंत 42 हल्लेखोरांना अटक देखील करण्यात आली आहे. पोलिसांनी वनभूलपुरा हिसांचारात सहभागी असलेल्या 9 वाँटेड गुन्हेगारांचे पोस्टर्स जारी केले आहेत. हे पोस्टर्स शहरात विविध ठिकाणी लावण्यात आली आहेत.

याचबरोबर पोलिसांनी स्थानिकांना आवाहन देखील केले आहे. कुणालाही हल्लेखोरांबद्दल माहिती मिळाल्यास नैनीताल पोलिसांच्या अधिकृत फोन नंबरवर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. या करीता पोलिस नियंत्रण कक्षा कडून कक्ष क्रमांक जारी करण्यात आले आहेत. हिसांचारचा मुख्य आरोपी अब्दुल मलिक आणि त्याचा मुलगा अब्दुल मोईद यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

8 फेब्रुवारी रोजी शहरातील मदरशात तोडफोड झाल्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ घटनेसंदर्भात अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची एकूण संख्या 42 वर पोहोचली आहे. या हिसांचाराचा मास्टर माइंड अब्दुल मलिक याने हा मदरसा बेकायदेशीर बांधला होता तसेच मदरसा पाडण्यास विरोधही करत होता. त्यामुळे दंगलीत झालेल्या नुकसानीची जबाबदारी त्याच्या डोक्यावर टाकण्यात आली आहे. या हिसांचारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नगरपालिकेने अब्दुलला नोटीस बजावली असून, त्याच्याकडून 2.44 कोटींची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.