
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्याचवेळी आपल्याला धमकीचे संदेश मिळत असल्याचा आरोप ट्विटरवरून केला आहे. तसेच आता भाजपला विरोध करणाऱ्यांना ठार केले जाईल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अमित शाह जी गृह मंत्री बने हैं इसलिए मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं।लेकिन आज कुछ भक्तों के मुझ पर मैसेज आए कि अब तेरा क्या होगा हार्दिक।मतलब अमित शाह के गृह मंत्री बनने के बाद भक्त काफी खुश हैं।भाजपा के खिलाफ लड़ने वाले हम जैसे युवा को मार दिया जाएगा ? चलों जैसी भगवान की इच्छा !
— Hardik Patel (@HardikPatel_) May 31, 2019
हार्दिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ” अमित शहा केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, मात्र आज मला काही समर्थकांचे ‘अब तेरा क्या होगा हार्दिक’ असे संदेश आले”. याचा अर्थ भाजप विरोधात लढणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना आता ठार मारले लाईल का? चला जशी परमेश्वराची इच्छा!” असे ट्वीट केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता. मात्र भाजपने गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागांवर काँग्रेसचा सुपडा साफ करून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे वैतागलेल्या हार्दिक यांनी ”कांग्रेस नव्हे…बेरोजगारी हरली आहे. शिक्षण हरले आहे, शेतकरी हरले आहेत, महिलांचा सन्मान हरला आहे, सामनान्य जनतेशी जोडलेला प्रत्यक मुद्दा हरला आहे. खरेतर हिंदुस्तानची जनता हरली आहे” असे ट्वीट करून संताप व्यक्त केला होता.
























































