
जालना जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजीच्या भल्या पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील जालना, मंठा, परतूर, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात पाऊस सुरू आहे.
अनेक ठिकाणी नद्यानाल्यांना पूर आले आहे. तर पावसाचा जोर अधिक असल्याने जालना, अंबड शहरातील अनेक दुकानात कमरेवर पाणी साचले त्यामुळे अनेक व्यापाऱ्याचे नुकसान झाले आहे. भोकरदन तालुक्यातील पारध येथील रायघोळ नदीला पुराचे पाणी वाढले आहे.
घनसावंगी तालुक्यातील गोदावरीवरील मंगरूळ उच्च पातळी बंधारा 31 ऑगस्ट रोजी 100 टक्के भरला असल्यामुळे सकाळी 08:30 वाजता बंधाऱ्याच्या 8 गेट द्वारे 80 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील विविध भागांत सोमवार रात्री उशिरा सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे कुठे झाडे उन्मळून पडत आहेत. अंबड शहरामध्ये सुद्धा वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकाचे नुकसान झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून अंबडच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस रोज जोरदार हजेरी लावली आहे.
आज ताडहादगाव, पारनेर, यासह इतर काही भागात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील होता. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे उफळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
बदनापूर तालुक्यात पहाटे 4 नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस सूरू असून तालुक्यातील खरीप मका, सोयाबीन, तूर, कापूस पिकांना मोठा दिलासा तर पाणी पातळीत वाढ झाल्यास रब्बी हंगामासाठी या पावसाचा फायदा होणार आहे.




























































