LIVE : मुंबईत अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai rain

सामना ऑनलाईन । मुंबई 

मुंबई व उपनगरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली होती.

  • मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामानखात्याचा इशारा

mumbai rain

  • सायन माटुंगादरम्यान रुळावर पाणी साचले

  • कुर्ला-विद्याविहार दरम्यान रुळावर पाणी, वाहतूक १ तास उशिराने
  • पूर्व मुंबईत सरासरी १३३ मिमी पाऊस
  • पश्चिम मंबईत सरासरी १११. मिमी पाऊस
  • दक्षिण मुंबईत सरासरी ५० मिमी पाऊस पडला.
  • पावसामुळे मध्य रेल्वेचा आजचा मेगाब्लॉक रद्द
  • मुसळधार पावसामुळे माटुंग्याच्या पुलावर वाहतूक कोंडी
  • ठाणे कल्याण भिवंडीत संततधार
  • घाटकोपर येथील पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद
  • मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल अर्धातास उशिराने
  • समुद्र, धबधबे यांच्यापासून दूर राहण्याचे नागरिकांना आवाहन
  • रविवारी व सोमवारी देखील मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा
  • नालासोपारा स्थानकाजवळ रस्त्यावर पाणी साचले
  • मेट्रो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या पुलाखाली पाणी साचले
  • मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, कोकणातही मुसळधार पाऊस
  • सायन परळ परिसरात जोरदार पाऊस
  • वेस्टर्न एक्सप्रेसवरची वाहतूक धीम्या गतीने सुरू
  • मुंबईत अनेक भागात मुसळधाार पाऊस