कामाचे आमिष दाखवून तरुणीला 25 दिवस ओलीस ठेवले, जबरदस्ती धर्मांतर करण्याचाही प्रयत्न

लव्ह जिहाद आणि जबरदस्ती धर्मांतराचा मुद्दा तापलेला असताना उत्तर प्रदेशमधील कानपूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. येथे एका 18 वर्षीय तरुणीला मुस्लिम तरुणाने फूस लावून लखनौला नेले आणि तिला 25 दिवस ओलीस ठेवले. तरुणाने आपल्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि नकार दिल्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहनवाज असे आरोपीचे तरुणाचे नाव आहे. कॉमन मित्राने दोघांना एकमेकांची ओळख करून दिली होती. त्यानंतर आरोपीने ब्युटी पार्लरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिला लखनौला घरी बोलावले आणि कैद करून ठेवले.

पीडिते 3 जानेवारी रोजी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला पट्ट्याने मारहाण केली. तसेच अंगावर रॉकेट टाकून तिला जीवंत जाळण्याचीही धमकी दिली. जवळपास 25 दिवस पीडिता आरोपीच्या घरामध्ये ओलीस होती. मात्र एक दिवस महत्प्रयासाने तिने मोबाईल मिळवला आणि कुटुंबियांशी संपर्क साधला.

पीडितेच्या फोननंतर कुटुंबिय कानपूरहून लखनौला पोहोचले आणि मुलीची सुटका केली. यानंतर तिला एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुजैनी पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी अंकिता शर्मा यांनी दिली.