हॉपशूटला मिळतोय सोन्याचा भाव, एक किलोला 85 हजारांचा दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात महागडय़ा भाजीची किंमत किती असेल, काही अंदाज लावलाय का. या महागडय़ा भाजीला सोन्याचा भाव आला आहे. हॉपशूट असे या भाजीचे नाव असून औषधी गुणधर्मासाठी ती ओळखली जाते. हॉपशूटची प्रति किलो किंमत सुमारे 85 हजार रुपये आहे. भाजीची किंमत तिच्या गुणवत्तेनुसार बदलत राहते. ती एक लाखापर्यंतही जाते. भाजी आकाराने लहान असते. क्षयरोग उपचारात तसेच चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव यावर या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते असे म्हटले जाते.