
डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरात राहणाऱ्या शकुंतला गायकवाड (७०) या वयोवृद्ध महिलेच्या घराला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य, मोबाईल फोन, अन्नधान्य तसेच सुमारे २५ हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली. सुदैवाने शकुंतला गायकवाड या सत्संगासाठी बाहेर गेल्याने त्यांचा जीव वाचला.
देसलेपाडा परिसरात राहणाऱ्या शकुंतला गायकवाड या वृद्ध महिलेच्या घराला रात्री भीषण आग लागली. सदर आगीत घरगुती संपूर्ण साहित्य आणि २५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जळून खाक झाला. सुदैवाने शकुंतला या सत्संगासाठी बाहेर गेल्या असल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र या आगीत त्यांच्या घरातील सर्व घरगुती साहित्य, मोबाईल फोन, अन्नधान्य संपूर्ण जळून खाक झाले. याशिवाय त्यांची नात दीपांजली हिची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रेही आगीत नष्ट झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.




























































