
- फाटलेल्या, जुन्या कपडय़ांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारचे कपडे दान करावेत किंवा इतर कामांमध्ये उपयोग करावा.
- देवी-देवतांचे फाटलेले फोटो किंवा जुनी, खंडित मूर्ती घरात ठेवू नये. त्या मूर्ती नदीमध्ये सोडाव्यात. तसेच एकाच देवतेच्या तीन-तीन मूर्ती घरामध्ये ठेवू नयेत.
- अनावश्यकदगड, रत्ने, अंगठय़ा किंवा इतर सामान घरात ठेवतात, पण त्यातल्या अनेकांना त्याबद्दल माहीत नसते. अशा प्रकारच्या वस्तू घरात ठेवू नयेत.
- अनेकांना घराच्या छतावर कचरा टाकण्याची किंवा व्यर्थ सामान ठेवण्याची सवय असते. घरावर अशा प्रकारच्या वस्तू ठेवू नयेत.
- घराततुटलेल्या आणि फुटलेल्या अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. त्यामुळे घरात वास्तुदोष उत्पन्न होतो.
- घरकिंवा दुकानातील अलमारी तुटलेली असू नये. तुटलेली अलमारी आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरते.
- घरातकोळ्याने जाळे केले असेल तर ते काढून टाका. कोळ्याचं जाळं घरात वास्तुदोष निर्माण करते.
- घराततुटलेली खुर्ची किंवा टेबल असल्यास या गोष्टी घरातून काढून टाका. त्यामुळे तुमचे उत्पन्न स्रोत थांबतात.

























































