
एखादा खेळ खेळणे, लॉनमध्ये बाग काम करणे यासारखी अनेक दैनंदिन कामे करत असताना आपण आपल्या हाताचा वापर करतो. काम आटोपल्यानंतर हात स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी हँड सॅनिटायझर वापरणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या हातावरील बहुसंख्य सूक्ष्मजंतूंचा नायनाट करण्याचा हा प्रभावी मार्ग ठरतो. तुमच्या हातात थोडेसे लिक्विड घ्या. केवळ 30 सेकंद दोन्ही हात एकमेकांना घासून तुम्ही तुमचे हात स्वच्छ करु शकता.
1) जर तुम्ही हातात दागिने वापरत असाल तर ते काढून हात स्वच्छ करा. हँड सॅनिटायझरचा प्रभावी उपयोग करुन घेण्यासाठी हातातील हे दागिने काढून घ्या. मगच हात स्वच्छ करा. सॅनिटायझरचा वापर करण्याआधी शक्य असल्यास तुमच्या हातवरील सहज दिसणारे धुळीचे कण, अन्नाचे कण, वंगण स्वच्छ धुवा आणि काढून टाका.
2) हँड सॅनिटायझर एका तळहातावर घ्या. हलक्या हाताने दोन्ही हात एकमेकांना घासा. आपल्या दोन्ही हातांचे पृष्ठभाग, बोटांसह नखांच्या टोकाला सॅनिटायझर लावले आहे याची खात्री करा. मनगटावर किमान 2 इंच अंतरापर्यंत तुम्ही सॅनिटायझरचा वापर करा.
३) हात कोरडे करा – जवळपास 30 सेकंद दोन्ही हात एकमेकांना चोळल्यानंतर त्वचा सॅनिटायझर शोषून घेईल. जर हात तरीही ओले वाटत असतील तर ते जमिनीच्या दिशेला करुन कोरडे करा. वेळोवेळी हँड सॅनिटायझर वापरणे फायद्याचे.
ज्यावेळी प्राणी किंवा पशू, लोक आणि अन्न याच्या संपर्कात याल त्यावेळी संसर्ग किंवा आजार पसरण्याचा धोका अधिक असू शकतो. तुम्ही कोणत्या गोष्टीला स्पर्श केला आहे. तुमच्या संपर्कात कोणत्या गोष्ट आहेत याचा विचार करुन वेळोवेळी हँड सॅनिटायझर वापरा. ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही अधिक निरोगी राहाल.
हात अधिक अस्वच्छ असतील तर ते धुवा – वाहत्या पाण्यात हात स्वच्छ धुणे हा जंतू काढून टाकण्याचा किंवा निष्क्रिय करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. बऱ्याचदा स्नानगृह किंवा वॉशरुमचा वापर करणे अशक्य असते. अशा वेळी हँड सॅनिटायझरचा वापर जंतूंचा प्रसार आणि आजाराची संभाव्य शक्यता कमी करण्यासाठी सोयीस्कर ठरेल. हँड सॅनिटायझर हानिकारक रसायने काढून टाकू किंवा निष्क्रिय करू शकत नाही. जर तुम्ही कोणत्याही रसायनांच्या किंवा कीटकनाशकांच्या संपर्कात आल्यास साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. तुमचे हात साबणाने धुणे हा COVID-19 मारण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे


























































