राणा दांपत्य राहत असलेल्या इमारतीत बेकायदा बांधकाम, पालिकेकडून अडीच तास झाडाझडती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा राहत असलेल्या खारच्या इमारतीमधील इतर फ्लॅटमध्येही बेकायदा बांधकाम आढळले आहे. याप्रकरणी पालिकेने आज तब्बल अडीच तास संबंधित इमारतीची तपासणी केली. संबंधित प्लॅटमध्ये आढळलेल्या बेकायदा बांधकामप्रकरणी नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले.

खार पश्चिम, रोड -14 वर ‘लाव्ही’ इमारतीत राणा दांपत्य यांचे घर आहे. या ठिकाणी मंजूर आराखडय़ाव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या प्रकरणात राणा दांपत्याला न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे, मात्र संबंधित इमारतीमधील इतर फ्लॅटमध्येही बेकायदा बांधकाम असल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या होत्या. यानुसार वांद्रे पश्चिम वॉर्ड ऑफिसकडून संबंधित रहिवाशांना तपासणीची नोटीस बजावण्यात आली होती. यानुसार आज तपासणी केली असता बेकायदा बांधकाम आढळले.