
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफचे माजी अध्यक्ष इम्रान खान यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिओ टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांच्या आधी हा जामीन मिळाल्याने इम्रान खान यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
तोशाखान प्रकरणात इम्रान खान यांना ऑगस्ट महिन्यात दोषी ठरवण्यात आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात कैद आहेत. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

























































