
पुणे शहरातील मध्यवर्ती खडक पोलीस ठाण्यातंर्गत नव्याने बनविण्यात आलेल्या अमलदार कक्षाचे उदघाटन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे उपायुक्त संदीप सिंह गिल्ल एसीपी सतीश गोवेकर उपस्थित होते.
खडक पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या अमलदार कक्षाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. विशेषतः हँगिग गार्डनमुळे ठाण्याची शोभा वाढण्यास मदत झाली आहे. उदघाटन समारंभाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

























































