
सामना ऑनलाईन, मुंबई
लोकसभा निवडणुकीपासून फुल फॉर्मात असलेल्या भाजपला संपत्तीसौख्यही लाभले आहे. पक्षाची संपत्ती वर्षभरात जवळपास 22.27 टक्क्यांनी वाढली. 2016-17 मध्ये 1213 कोटी असलेली संपत्ती 2017-18 मध्ये 1483 कोटींपर्यंत गेली आहे. दुसरीकडे याच अवधीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपत्तीला मात्र उतरती कळा लागली.
काँग्रेसची संपत्ती 854 कोटींवरून 724 कोटींपर्यंत घटली तर राष्ट्रवादीच्या घोषित संपत्तीत 11.41 कोटींवरून 9.54 कोटींपर्यंत घट झाली. ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ने (एडीआर) बुधवारी देशातील सात प्रमुख राजकीय पक्षांच्या संपत्तीचा लेखाजोखा सादर केला.























































