
क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी लढती 151 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. आता पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लीड्समध्ये हेडिंग्ले मैदानावर पार पडणार आहे. या मैदानावर टीम इंडिया गेल्या 54 वर्षापासून अपराजित राहिली असून गेल्या लढतीत येथे विजय मिळवला आहे. त्यामुळे विराटसेनेचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असणार असून हेडिंग्लेमध्ये विजयाची हॅटट्रीक साजरी करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
हेडिंग्लच्या मैदानावर दोन्ही संघात आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात हिंदुस्थानने 2 विजय मिळवले आहेत, तर तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच एक सामना अनिर्णित राहिला आहे.
‘हिटमॅन’ शर्मा आणि बुमराहला कपिलदेव यांचा विक्रम मोडण्याची संधी, लीड्समध्ये उभारणार विक्रमांचे इमले
लिड्समध्ये 1952, 1959 आणि 1967 मध्ये झालेल्या लढती टीम इंडिया गमावल्या होत्या. तर 1986 आणि 2002 मध्ये झालेला सामना टीम इंडियाने जिंकला होता. 1967 मध्ये टीम इंडियाचा येथे अखेरचा पराभव झाला होता. गेल्या 54 वर्षापासून टीम इंडिया येथे अपराजित असून विजयाची हॅटट्रीक करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
हेडिंग्लेवरील ‘द्वंद्व’
1. 5 जून ते 9 जून 1952 – इंग्लंड 7 विकेट्सने विजयी
2. 2 जुलै ते 4 जुलै 1959 – इंग्लंडचा एक डाव आणि 173 धावांनी विजय
3. 8 जुलै ते 13 जुलै 1967 – इंग्लंडचा 6 विकेट्सने विजय
4. 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 1979 – सामना अनिर्णित राहिला
5. 19 जून ते 23 जून 1986 – हिंदुस्थानचा 279 धावांनी विजय
6. 22 ते 26 ऑगस्ट 2002 – हिंदुस्थानचा एक डाव आणि 46 धावांनी विजय


























































