हिंदुस्थानकडे 800 टन सोने!

जगात सर्वात जास्त सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. त्यांच्याकडे 8,133.45 टन सोने आहे. हिंदुस्थानकडे 800.78 टन सोने आहे. सौदी अरबकडे 232.07 टन सोने आहे. ब्रिटनकडे सौदीच्या तुलनेत कमी सोने आहे. ब्रिटनकडे सोन्याचा साठा 310.29 टन आहे.

कोणत्याही देशाला आर्थिक स्थिरता कायम ठेवायची असेल तर त्या देशाकडे सोन्याचा साठा जास्त असायला हवा. देशात ऐनवेळी आर्थिक मंदी उद्भवल्यास देशातील सोन्याचा साठा अशा वेळी उपयोगी पडतो. त्यामुळे जगातील प्रत्येक देश सोन्याचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. जगात कोणत्या देशाकडे सर्वाधिक सोने आहे याची माहिती नुकतीच एका रिपोर्टमधून समोर आली आहे. सौदी अरब या देशाकडे सुद्धा खूप सारे सोने आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये सौदी अरबकडे जवळपास 432.934 मिलियन डॉलर किंमतीचा सोन्याचा साठा आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार, सौदीकडे 323.07 टन सोने आहे. जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशाच्या यादीत सौदी अरब 16 व्या नंबरवर आहे. सीआयईसीने एक अहवाल प्रसिद्ध केला असून यानुसार, हिंदुस्थान सोन्याच्या साठय़ात सौदी अरब, ब्रिटन आणि स्पेन यासारख्या देशांच्या पुढे आहे.