
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 93,294 कोरोनाग्रस्त आढळून आले असून 513 जणांचा मृत्यू झाला आहे. तर साठ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
India reports 93,249 new #COVID19 cases, 60,048 discharges, and 513 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,24,85,509
Total recoveries: 1,16,29,289
Active cases: 6,91,597
Death toll: 1,64,623Total vaccination: 7,59,79,651 pic.twitter.com/026IX9OPtW
— ANI (@ANI) April 4, 2021
देशात गेल्या वर्षभरात 1,24,85,509 जणांना कोरोना झालेला आहे. त्यात 6,91,597 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,16,29,289 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 1,64,623 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे लसीकरण सुरू आहे.
या लसीकरणाचा हा तिसरा टप्पा सुरू आहे. आतापर्यंत 7,59,79,651 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात आली तर आता 1 मार्चपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केलीआहे.




























































