
हिंदुस्थानच्या युवा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या गेलेल्या या मालिकेत हिंदुस्थानने हा इतिहास घडवला आहे. शनिवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने सहज विजय मिळवला.
इंग्लंडने अंतिम सामन्यात 189 धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियासमोर 190 धावांचं लक्ष्य होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानी संघाने 47.4 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 195 धावा केल्या आणि विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरलं.
2⃣0⃣0⃣0⃣ 🏆
2⃣0⃣0⃣8⃣ 🏆
2⃣0⃣1⃣2⃣ 🏆
2⃣0⃣1⃣8⃣ 🏆
2⃣0⃣2⃣2⃣ 🏆India U19 – The FIVE-TIME World Cup Winners 👏 🔝#U19CWC #BoysInBlue pic.twitter.com/DiE53Sdu0Y
— BCCI (@BCCI) February 5, 2022
या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने खूप सावध सुरुवात केली. दुसऱ्या चेंडुवरच पहिला गडी बाद झाल्यानंतर हरनूर सिंह आणि शेख रशीद यांनी भागीदारी रचली. त्यानंतर 95 आणि 97 धावांवर इंडियाला दोन गडी गमवावे लागले. अखेर निशांत सिद्धू, राज बावा आणि नंतर दिनेश बाना यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
View this post on Instagram
ज्या प्रमाणे 2011मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तत्कालीन कप्तान महेंद्र सिंग धोनीने शेवटचा षटकार ठोकत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्याचप्रमाणे या सामन्यातही टीम इंडियाच्या दिनेश बानाने षटकार ठोकून विजय निश्चित केला.




























































