Lok sabha 2019 निवडणुका जाहीर होताच जनता भाजपच्या जाहिरातींपासून मुक्त होईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये 17 व्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. वेळापत्रक जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल. या पत्रकार परिषदेपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मायावती यानी भाजपवर निशाणा साधला. निवडणुका जाहीर झाल्यानंतर देश भाजपच्या जाहिरातींपासून मुक्त होईल, असा टोला मायावती यांनी लगावला.

Lok sabha 2019 निवडणुकांचे बिगुल वाजणार? 2014 महाराष्ट्रात कधी झालं मतदान

मायवती यांनी सोशल मीडियावर एक ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला. ट्वीटमध्ये म्हणतात, ‘निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. यातंतर पंतप्रधान मोदींच्या ‘पोकळ आणि निराधार’ घोषणापासून जनता मुक्त होणार आहे. लोकांनी भाजपच्या रणनीतीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.’